1 मे पासून सर्वांना कोरोना लस....... शासनाने नियोजन करावे !!

1 मे पासून सर्वांना कोरोना लस....... शासनाने नियोजन करावे !!

        कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला असून देशातील जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे.

         देशात जानेवारी २१ पासून लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता. १ मार्च पासून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यात ४५ वर्षा वरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेऊन मोदी सरकारने १८ वर्षा वरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला.

    दुसऱ्या टप्प्यात सर्वच लसीकरण केंद्रात गर्दी होती. काही केंद्रावर लसीचा साठा कमी आल्याने, असंख्य नागरीकांना निराश होऊन परतावे लागले. १ मे पासून १८ वर्षा वरील सर्वांना लस देण्यात येणार असल्याने सर्वच केंद्रावर खूपच गर्दी होणार आहे. व प्रशासनाला गर्दी आटोक्यात आणणे कठीण होईल.

       महाराष्ट्र शासन व पालिका प्रशासनाने याचा अभ्यास पूर्वक विचार विनिमय  करून व पूर्ण लसीचा कोठा उपलब्ध झाल्या नंतरच सर्वांना लस देण्यात यावी.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week