
ज्येष्ठांना लस घरी द्यावी !!
देशात १६ कोटी ज्येष्ठ नागरिक असून, ८० वर्षा वरील २.८ कोटी ज्येष्ठ आहेत. त्यापैकी ब-याच जणांना मधुमेह, हृदयविकार, उच्चदाब, आजार आहेत.अनेक अंथरुणात असून ते फिरूही शकत नाहीत. काही ज्येष्ठ एकाकी जीवन जगत आहेत. लस घेण्यासाठी रुग्णालयापर्यंत जाऊ शकत नाहीत. ज्या ज्येष्ठना दीर्घ कालीन आजार असतील त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने व पालिका प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन लस द्यावी.