माजी नगरसेवक भरत गुजर यांनी वाढत्या कोरोनाबाबत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन !!
महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव पुन्हा वाढलाय आणि म्हणूनच हॉस्पिटलची गरज ही वाढली आहे. कोरोना रूग्णाचा त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पीटल मधे प्रवेश मिळवून देणे फार अवघड जात आहे, त्यामुळे त्याना हॉस्पीटलसोबत तडजोड करावी लागत आहे. वाढीव चार्जेसने पॅकेज घ्यावे लागत आहे किंवा नंतर वाढीव बील जे त्याच्या आवाक्या बाहेर असते ते भरावे लागत आहे.
महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढून हॉस्पीटलच्या आयूसी, वेंटिलेटर बेड्स किंवा रूग्णालयात देण्यात येणाऱ्या औषधाचे दर ठरवून दिले आहे. तथापि त्याची माहिती नसल्याने लोकांना हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराला सामोरे जावे लागत आहे. लाखों रुपयांचे बील नाईलाजाने भरावे लागत आहे. तसेच राज्य सरकारने परिपत्रक काढून प्रत्येक हॉस्पीटल साठी एक ऑडीटर नेमण्याची ताकीद केली असून त्यामुळे नागरिकांना बील भरण्यात किंवा अन्य तक्रारीबाबत निवारण करण्यात मदद होऊ शकेल. दुर्देवाने हॉस्पीटल व्यवस्थापकानी ह्याची प्रसिद्धि न करून जाणीवपूर्वक अवहलेना केली आहे. तरी माझी आपणास विनंती आहे कि त्वरित शासन निर्णयाचा परीपत्रक काढून प्रत्येक हॉस्पीटल मधे स्पष्ट दिसणार जागी तसेच ऍडमिशन काउन्टर जवळ रुग्णांसाठी आकारण्यात येणारा दराचा फलक लावण्याचा आदेश द्यावेत. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या ऑडिटरचे तपशील सम्पर्क नबंरासह लावण्यात यावे. शा प्रकारचे निवेदन माजी नगरसेवक भरत गुजर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.