जीवे मारण्याचा कट रचल्याबाबत गुन्हा दाखल करावा, सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे !!

जीवे मारण्याचा कट रचल्याबाबत गुन्हा दाखल करावा, सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे !!

         सामाजिक कार्यकर्ते अशोक टाव्हरे यांनी पुणे, खेड पोलीस स्टेशनचे काही अधिकाऱ्यांच्या वर जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली असून दि. १ एप्रिल पासून खेड पोलीस स्टेशन येथे धरणे आंदोलनास बसणार आहे.

      कनेरसर ता. खेड जि. पुणे येथील गंभीर प्रकरणाबाबत अशोकराव टाव्हरे यांनी शासन व उच्च न्यायालयात पाठपुरावा केला होता. गेली काही महिने त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या होत्या, तर २१ मार्चला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, तरी या गंभीर निवेदनांची दखल घेतली गेली नाही.

        त्यामुळे काही पोलीस अधिकारी सुद्धा ह्या कटात सामील आहे अशी माहिती टाव्हरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात नुकतेच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week