देशातील सर्वात छोटी होळी !!
आज कोरोनाच्या काळात आपल्याला होळी सण साजरा करायला अनेक निर्बंध आहेत पण आनंद घ्यायचा झाला तर तो कसाही घेऊ शकतो व परंपरा साजरी करू शकतो, म्हणून घरातल्या घरात आनंद देणारी ही "छोटीशी होळी" ची कल्पना नागरिकांसाठी तयार केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार एकत्रित होळी साजरी करू शकत नाही. परंतु घरात सुद्धा होळी करू शकतो ही कल्पना सातरस्ता येथे राहणाऱ्या, श्रीमती अरुणा जैतपाल यांनी केली आहे. त्याची प्रतिकृती त्यांनी तयार केली आहे. त्यामुळे जळाऊ लाकडं होळीसाठी लागणार नाही. असे श्रीमती जैतपाल यांनी सांगितले.