
कामगार नेते अनिल गणाचार्य यांची मुंबई काँग्रेसच्या चिटणीस पदी निवड !
कामगार नेते अनिल गणाचार्य यांची मुंबई काँग्रेसच्या चिटणीस पदी निवड !
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नुकतेच मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये मुंबई काँग्रेसच्या सचिवपदी कामगार नेते अनिल गणाचार्य यांची अध्यक्ष, आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली.
अनिल गणाचार्य हे काँग्रेस व इंटकमध्ये गेली पंचवीस वर्षापासून कार्यरत आहेत. ते गेली 35 वर्षांपासून दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कार्यकारी सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांची 2017 साली मुंबई इंटकच्या अध्यक्षपदी आणि महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. गणाचार्य हे गेली 40 वर्षापासून श्रमिक उत्कर्ष सभेचे चिटणीस पदी कार्यरत आहेत. गणाचार्य यांनी कामगारांसाठी अनेक लढे दिले आहेत. तसेच ते जनरल इन्शुरन्स एजंट असोसिएशनचे संस्थापक सरचिटणीस असून कामगार संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र इंटक तर्फे नेतृत्व करतात. त्यांची मुंबई कॉंग्रेसच्या चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांना भेटण्यासाठी समाजातील अनेक मंडळे, सेवाभावी संस्था गर्दी करत आहेत.