
मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
मुख्यमंत्री चषक क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
अकदास वेल्फेअर व त्यांचे चेअरमन श्री. रमजान म. अली शेख यांच्या मार्फत भव्य क्रिकेट स्पर्धा - मुख्यमंत्री चषक २०२१ चे आयोजन वीर संभाजी मैदान डोंगरी येथे दिनांक १३ मार्च व १४ मार्च २०२१ रोजी करण्यात आले होते व या स्पर्धेत १० टीम आणि जवळपास ३०० तरुण क्रिकेट प्रेमींनी सहभाग नोंदवला.
श्री. रमजान म. अली शेख हे नेहमी युवकांना मुल्यवान मार्गदर्शन करुन युवकांमधील विविध कला गुणांना वाव देण्याचे कार्य नेहमी करतचं असतात. सदरच्या स्पर्धेस प्रसिद्ध कलाकार श्री. महेश कोकाटे सर (संभाजी सिरीयल), शिवसेना माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील साहेब, युवासेना उपसचिव सिद्धेश शिंदे, युवासेना मुंबई समन्वयक श्री. गणेश सुर्वे, शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळी व शिवसेना शाखाप्रमुख दिलीप सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.