नगरसेवक श्री रामदास कांबळे ह्यांच्या नगरसेवक निधीतुन व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा !

नगरसेवक श्री रामदास कांबळे ह्यांच्या नगरसेवक निधीतुन व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा !

       सोमवार दिनांक : १.०३.२०२१ रोजी संध्याकाळी ६.०० वा. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई प्रतीक्षा नगर येथील आरोग्यधाम व्यायामशाळेत प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक श्री रामदास कांबळे ह्यांच्या नगरसेवक निधीतून दिलेल्या आधुनिक उपकरणे व नूतनीकरण केलेल्या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा विभागप्रमुख, नगरसेवक श्री मंगेश सातमकर ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आला आहे.

      सदर कार्यक्रमास कामगार कल्याण सह आयुक्त श्री सयाजी पाटील साहेब, कामगार कल्याण अधिकारी श्री संतोष साबळे, विभागसंघटिका रिता वाघ, विभाग संघटक श्री दत्ता शिंदे, विधानसभा संघटिका सौ पद्मा शिंदे, उपविभागसंघटिका सौ शारदा गोळे, विधानसभा समनव्यक रवी परब, उपविभागप्रमुख श्री गोपाळ शेलार, शाखाप्रमुख संजय म्हात्रे, शाखासंघटिका नंदा शाहू, ह्यांच्या उपस्थितीत सदर लोकार्पण कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कमी लोकांच्या उपस्थिती मध्ये पार पडला, सदर व्यायामशाळेमुळे प्रभाग क्र१७३ मधील सर्व व्यायाम करणारी मुले आनंदित झाली आहेत, त्यांनी सर्व पदाधिकारी वर्गाचे आभार मांडले.


Batmikar
रिपोर्टर - गणेश शिंदे

Most Popular News of this Week