पवईत कराटे बेल्ट परीक्षा संपन्न !

पवईत कराटे बेल्ट परीक्षा संपन्न !

             एशियन शितो-रिशु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन पवई मुंबई शाखेतर्फे नुकतेच कराटे बेल्ट परीक्षा मुक्तेश्वर आश्रम येथे पार पडली. नंतर झालेल्या बेल्ट प्रदान कार्यक्रमात ऑरेंज, ग्रीन, पर्पल, यलो सिल्वर, ग्रीन, ब्राऊन बेल्ट आणि प्रमाणपत्रे उत्तीर्ण खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

       सदर कार्यक्रमास हिंदी, मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री डॉ.स्मिता डोंगरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समष्टीधर्म संचारेश्वर ट्रस्ट चे सचिव पत्रकार चंद्रशेखर दाभोळकर, आयआयटी चे प्रोफेसर प्रसनजीत भौमिक, चीफ कराटे मास्टर कोयशी संजय गव्हाळे यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमाचे आयोजन मुख्य कराटे प्रशिक्षक संसुई अमृत भीमराव जबडे यांनो केले होते. गेली अनेक वर्षे पवई विभागात कराटे खेळ प्रकार मुलांच्या मनात रुजवून विविध वयोगटातील खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी जबडे सर झटत आहेत. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी या राज्य स्थरावर मेडल्स पुरस्कार प्राप्त केले आहेत.

           डॉ स्मिता डोंगरे यांनी मुलगा मुलगी असा भेदभाव न करता खेळ प्रकार खेळले गेले पाहिजेत आणि कराटे मध्ये मुली अधिक प्रशिक्षण घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कराटेच्या नियमित सरावासाठी ट्रस्ट तर्फे लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन याप्रसंगी श्री.दाभोळकर यांनी दिले.

        कार्यक्रमाला विद्यार्थ्यांच्या पालक, नातेवाईकांनी गर्दी केली होती. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करून हा कार्यक्रम संपन्न झाला.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week