मत्स्य शिल्प स्पर्धेत आनंद मेस्त्री प्रथम क्रमांकाने विजयी !!

मत्स्य शिल्प स्पर्धेत आनंद मेस्त्री प्रथम क्रमांकाने विजयी !!

          सिंधुदुर्ग : सिंधु आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद  यांच्या माध्यमातून मत्स महोत्सवात मत्स शिल्प स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथे केले होते. या स्पर्धेत विविध लक्षवेधी सामाजिक संदेश देणारी शिल्प साकारण्यात आली. त्यात प्रथम आनंद मेस्त्री (माणगांव), द्वितीय -काका सावंत ( माजगाव), तृतीय आशिष कुंभार, अंतिम विजयी झाले. उत्तेजनार्थ समीर चांदरकर,(मालवण-कट्टा),व रविराज चिपकर ( आरवली) यांना जाहीर झाले.

        विजेत्यांना भाजप प्रदेश सरचिटणीस- रवींद्र चव्हाण व अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

           या सोहळ्यात जिल्हाध्यक्ष- राजन तेली, सिंधु आत्मनिर्भर योजनेचे संयोजक -अतुल काळसेकर, नगराध्यक्ष- संजू परब, मत्स शास्त्रज्ञ -डॉ विवेक वर्तक, आरोग्य सभापती- सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती-उदय नाईक, नगरसेवक- आनंद  नेवगी, ऍड.परिमल नाईक, नगर सेविका- दिपाली भालेकर, महिला शहर अध्यक्षा - मोहिनी मडगावकर, आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.

     मत्स शिल्प स्पर्धेचे परीक्षण विजेंद्र मांजरेकर व ओंकार मांजरेकर यांनी केले होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week