
कुर्ला येथील रस्ते सुरक्षा अभियानात शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती !
कुर्ला येथील रस्ते सुरक्षा अभियानात शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती !
रस्ता सुरक्षा मोहिमेचे नुकतेच नेहरू नगर कुर्ला येथे आयोजन करण्यात आले होते. रस्ता अपघतापासून बचाव करण्यासाठी रस्ता सुरक्षेचे नियमपाळणे गरजेचे आहे हे सांगणारे गीत आणि पथनाटय एस.के.पंतवालावलकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा, स्थानिक शिवसेना नगरसेविका सौ.प्रविणा मनिष मोरजकर यांच्या सहकार्याने ही मोहिम पार पडली. नागरिकांनी वाहतुकीचे सर्व नियम पाळून आपली वाहने चालवावी. तसेच वाहतूक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी या कार्यक्रमात केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक सत्येंद्र सामंत, पोलीस निरिक्षक पाटोळे, शदराडे तसेच प्रशिक्षीका रेखा प्रभु, अरविंद देशमुख, डॅा.पवन अगरवाल उपस्थित होते. एस के पंतवालावलकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यचे विभागातील नागरिकांकडून कौतुक आणि प्रशंसा करण्यात येत आहे.