शिक्षकपदी नियुक्ती केव्हा मिळणार ? महापालिकेत प्राथमिक १५० शिक्षक उमेदवार !

शिक्षकपदी नियुक्ती केव्हा मिळणार ? महापालिकेत प्राथमिक १५० शिक्षक उमेदवार !

        माध्यमिक शिक्षणाचे माध्यम मराठी असल्याने मुंबई महापालिकेने दीडशे शिक्षक उमेदवारांना प्राथमिक शिक्षक पदी नियुक्ती नाकारली आहे.

         गेल्या दीड वर्षापासून शिक्षक सतत पाठपुरावा करीत आहेत.परंतु वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करूनही या शिक्षकांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आम्हा शिक्षकांना नियुक्ती केव्हा मिळणार ? असा सवाल करीत या शिक्षकांनी महापालिकेविरुद्ध आझाद मैदान येथे आंदोलन पुकारले आहे.

              तब्बल दहा वर्षांनंतर शासनाने शिक्षक भरतीची घोषणा केली शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी अभियोग्यता चाचणी परीक्षा घेऊन राज्यातील शिक्षक पदे भरू असे जाहीर केले. त्यानुसार डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली या चाचणीत मिळालेल्या या गुणांच्या आधारे पारदर्शक अनेक शिक्षकांची निवड या हेतूने पवित्र ही संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली.

          या पवित्र प्रणालीवर सर्व इच्छुक उमेदवार आपली शैक्षणिक व इतर माहिती नोंद करतात. राज्यातील शासकीय संस्था शिक्षक पदासाठी च्या जाहिराती पोर्टल वर येतात उमेदवार या संस्थेचा पात्र असेल त्या सर्व संस्था त्याला पवित्र वर दिसतात.           त्यानंतर उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार प्राधान्य क्रम द्यावे उच्चतम प्राधान्यक्रम असलेल्या ठिकाणी गुणांनुसार उमेदवार निवडले जातात. निवडलेल्या उमेदवाराची निवड झाली त्या संस्थेत जाऊन कागदपत्र पडताळणी करावी व नियुक्तीपत्र स्वीकारावे. अशी वरील प्रक्रियेनुसार आम्ही पवित्र प्रणाली वर माहिती नोंद केली व्यवसायिक शिक्षण बीएड, डीएड इंग्रजी असल्याने ' ' 'महानगरपालिका, असा प्राधान्यक्रम आम्हाला आला व त्यानुसार आमची प्राथमिक शिक्षक पदी 9 ऑगस्ट 2019 रोजी निवड झाली. पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आमची कागदपत्र पडताळणी करण्यात आली पडताळणी शिक्षण पूर्ण केल्यानंतर चार महिन्यांनी 'तुम्ही पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल, या शाळा प्रकाराच्या पात्रतेत बसत नसल्याने नियुक्ती देता येणार नाही असे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. असे शिक्षक उमेदवार योगेश परदेशी यांनी सांगितले.

           पालिकेचा दुपट्टे पणा मुंबई पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक होण्यासाठी संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून हवे असा पात्रता नियम आहे. पालिकेने मात्र ज्या उमेदवाराचे दहावीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले अशा उमेदवारांना नियुक्ती दिल्या व आमचे दहावी मराठी माध्यम म्हणून नियुक्त नाकारल्या आमच्या व्यावसायिक व उच्च शिक्षणाचा कसलाच विचार केला नाही.

       आमच्यातील बहुतांशी उमेदवारांचे कनिष्ठ महाविद्यालयीन व्यावसायिक पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण इंग्रजी माध्यमातून असूनही नियुक्ती नाकारल्या आहेत पालिकेच्या दुटप्पी धोरणाविरोधात आम्ही मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले असल्याची माहिती शिक्षिका प्रमिला माळी आणि शुभांगी वैद्य यांनी दिली.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week