गफार अब्दुल खान, ऊर्फ बादशहा खान यांची जयंती मुंबईत साजरी होणार !

गफार अब्दुल खान, ऊर्फ बादशहा खान यांची जयंती मुंबईत साजरी होणार !

      भारतरत्न महात्मा गांधी यांचे सहकारी खान गफार अब्दुल खान उर्फ बादशहा खान यांची १३१ वी जयंती मुंबईत ६ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे होणार आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी मुंबई प्रेस क्लब येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सरहद्द गांधी मेमोरियल सोसायटीचे चेअरमन सय्यद जलालुद्दीन, मुंबई काँग्रेस सेक्रेटरी निजामुद्दीन फिरोज मिठी बोरवाला, माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

       यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई म्हणाले की गफार खान हे भारत पाकिस्तान फाळणी च्या वेळी देशाची फाळणी होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते ते महात्मा गांधीजी यांच्या सोबत होते खान यांचे जीवन चरित्र मराठीमधून पुस्तकाद्वारे मी प्रसिद्ध करणार आहे तसेच हरियाणामध्ये त्यांच्या नावाचे हॉस्पिटल होते तेथे केंद्र सरकारने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिलेले आहे यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या हॉस्पिटल ला पुन्हा खान साहेबांचे नाव द्यावे अशी मागणी दलवाई यांनी यावेळी केली. 

       भारतरत्न खान अब्दुल गफार खान सरहद गांधी यांच्या नावे हरियाणा फरीदाबाद येथे एकमेव हॉस्पिटल होते त्याचे नामकरण नव्याने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असे करण्यात आले, सरहद्द गांधी म्हणजेच भारतरत्न खान अब्दुल गफार खान हे पठाण समाजाचे नेते होते महात्मा गांधीचे ते निकटचे सहकारी होते त्यांनी खुदाई इ खिदमत संघटना भारतात स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये उभारलेली होती.

      भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर त्यांनी व्यथित होऊन असे उद्गार काढले की माझी मरणोत्तर समाधी हि भारत-पाकिस्तान मध्ये न होता अफगाणिस्तानात असावी, अशा महान नेत्याच्या नावे सरहद्द गांधी मेमोरियल सोसायटीची स्थापना होणार आहे त्याची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून ही पत्रकार परिषद घेतली होती असे ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. 

      भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांची आठवण सर्वसामान्य जनतेला व्हावी म्हणून सदरच्या सोसायटीची स्थापना होत आहे, खान अब्दुल गफार खान यांचा पेशावर येथे जन्म झाला होता त्यांची कारकीर्द नेल्सन मंडेला यांच्याबरोबरची होती परंतु आज त्यांची कारकीर्द व त्यांचे देशासाठी असलेले योगदान हे सर्वांना माहिती व्हावे म्हणून सदरच्या ट्रस्टची स्थापना झालेली आहे भविष्यात खान अब्दुल गफार खान यांचे जीवन चरित्र मराठी मधून पुस्तकाद्वारे आम्ही प्रसिद्ध करणार आहोत तसेच त्यांचे मुंबई मध्ये स्मारक उभारण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहोत.

      आम्ही आगामी कार्यक्रमांमध्ये सह्यांची मोहीम राबवून हरियाणा मधील फरीदाबाद येथे अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिलेले हॉस्पिटल याचे पुन्हा नामकरण करण्यात यावे व त्याला भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांचे नाव देण्यात यावे याची विनंती करणारे पत्र देणार आहोत असे सुधींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week