
शासकीय कंत्राटी भरतीतील भ्रष्टाचाराबाबत भागवत वंगे करणार आंदोलन !
शासकीय कंत्राटी भरतीतील भ्रष्टाचाराबाबत भागवत वंगे करणार आंदोलन !
परभणी येथे शासकीय कंत्राटी भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शिवसेना लातूर तालुका प्रमुख भागवत वंगे हे मुंबई आझाद मैदानात २७ जानेवारी पासून आमरण आंदोलन करणार आहेत.
या शासकीय कंत्राटी भरतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून संबंधित व्यक्तीने ६ करोड रुपयाचा शासनाला चुना लावला आहे. हे शासनाचे ६ करोड रुपये वसूल केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसून आंदोलन सुरूच राहील अशी माहिती शिवसेना लातूर तालुका प्रमुख भागवत वंगे यांनी केली आहे.