भायखळ्यात माजी आमदार मधु चव्हाण यांनी केले ध्वजारोहण !

भायखळ्यात माजी आमदार मधु चव्हाण यांनी केले ध्वजारोहण !

         २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भायखळा विधानसभा मतदार संघात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य मा.आमदार श्री.अण्णा उर्फ मधु चव्हाण यांच्या हस्ते ’ध्वजारोहणाचा कार्यक्रम“ भायखळा (पूर्व) येथील पॅलेस सिनेमाजवळ आयोजित करण्यात आला. प्रजासत्ताक असलेल्या आपल्या देशात भाजपाचे मोदी सरकार जुलूम व हुकूमशाही पध्दतीने देशातील शेतकरी, कामगार व गोर-गरीब जनतेवर सातत्याने अन्याय करीत असून, देशातील गरीबांना अधिकाधिक गरीब बनविण्यात व अंबानी, अदानी सारख्या भांडवलदारांना अधिक श्रीमंत बनविण्यासाठी हे सरकार काम करीत आहे. देशाची घटना व लोकशाहीचे मुल्य वाचविण्यासाठी आपण सर्वांनी कटीबध्द राहिले पाहिजे असेही ते पुढे म्हणाले. भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ करुन देशातील नागरिकांना वेठीस धरले असल्याची टीकाही मधु चव्हाण यांनी केली.

        या ध्वजारोहण कार्यक्रमास विभागातील हिंदु-मुस्लीम नागरिकांसह काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी, तालुका महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, अल्पसंख्यांक विभाग व अन्य सेलचे शेकडो पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week