
शिवसेना महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद !
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला उद्देशुन आणि हिंदुहॄदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा क्र १९२ दादर नगरसेविका सौ. प्रिती प्रकाश पाटणकर आणि शाखाप्रमुख श्री. यशवंत विचले आयोजित महारक्तदान शिबिरास ८४६ रक्तदात्यानी रक्तदाना केले. यावेळी शिवसेना नेते/मा. मुख्यमंत्री प्राध्यापक श्री. मनोहर जोशी सर, शिवसेना नेते मा.मंत्री श्री. दिवाकर रावते, शिवसेना नेते श्री. संजय राऊत, शिवसेना उपनेत्या सौ. विशाखाताई राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, सीने अभिनेत्री शिवसैनिक उर्मिला मातोंडकर, आमदार विभाग प्रमुख सदा सरवणकर, म. विभाग संघटक सौ. श्रद्धाताई जाधव, मुंबई महापौर सौ. किशोरी पेडणेकर, मनपा आरोग्य समिति अध्यक्ष सौ. प्रवीणा मोरजकर, नगरसेवक टी जगदीश, वसंत नकाशे, उर्मिला पांचाळ, समाधान सरवणकर आणि शिवसैनिक पदाधिकारी आदि मान्यवर यांनी उपस्थित राहून रक्तदात्याना प्रोत्साहित केले.