मुंबई काँग्रेस सहकार सेलचा फायदा सर्व नागरिकांना झाला पाहिजे, आमदार भाई जगताप !

मुंबई काँग्रेस सहकार सेलचा फायदा सर्व नागरिकांना झाला पाहिजे, आमदार भाई जगताप !

        मुंबई काँग्रेस सहकार सेलवर सर्व मातब्बर मंडळी असून त्यांच्या ज्ञानाचा फायदा तळागाळातील गरीब नागरिकांना झाला पाहिजे असे जाहीर प्रतिपादन आमदार भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेस येथे सहकार सेलचे अध्यक्ष राजाराम भाई सावंत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले. ते पुढे म्हणाले मला या आपल्या सहकार सेलकडून खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. विना सहकार नाही उद्धार या ब्रीदवाक्य प्रमाणे आपल्याला काम करायचे आहे. आपण मुंबई काँग्रेसचा एक भाग आहात त्यामुळे आपण पहिली आपल्या कामापासून सुरुवात केली पाहिजे. आपणास कोणत्या मदतीची गरज लागल्यास मला नक्की सांगा ती मी त्वरित करीन.

            तर आमचे मुंबईत सर्व ६ जिल्ह्यात आमचे सहकाराचे जाळे पसरले असून त्याचा फायदा मुंबई कॉंग्रेसला आणि नागरिकांना नक्कीच होईल. आम्ही सहकार सेलच्या वतीने संपूर्ण मुंबईत सगळीकडे कार्यक्रम घेणार असून भाई आपली फक्त साथ आम्हाला असू दे अशी माहिती मुंबई काँग्रेस सहकार सेलचे अध्यक्ष यशवंत भाई सावंत यांनी दिली.

      या समारंभात सहकार सेलचे पदाधिकारी भवरलाल बडेस्वाल आणि इतर पदाधिकारी यांचा आमदार भाई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या समारंभात मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, सहकार सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week