
पोलिसांमुळेच मुंबई सुरक्षित खासदार सुप्रिया सुळे !
पोलिसांमुळेच मुंबई सुरक्षित खासदार सुप्रिया सुळे !
मुंबई पोलिसांमुळेच मुंबई सुरक्षित असून मी रात्रीही बाहेर सुरक्षित रित्या फिरू शकते असे जाहीर मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पिकेट रोड येथील एल. टी मार्ग पोलीस स्थानकात शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या समारंभात केले. त्या पुढे म्हणाल्या सध्या अनेक लोकांना पोलीस सिक्युरिटी हवी असते परंतु त्याचे पैसे शासन भरते. अनेकांची सिक्युरिटी कमी केली म्हणून मोर्चे निघायला लागले. ही अतिशय खेदजनक बाब आहे. सुदैवाने मी कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही त्याबाबत मी राज्य शासनाला लिहून दिले आहे.
अनेक सेलिब्रिटी मोफत शासनाची सिक्युरिटी घेतात. त्यांना शासनाने सिक्युरिटी देऊ नये असे माझे प्रामाणिक मत आहे. मुळात तुम्हाला सिक्युरिटी लागतेच कशाला. एका सेलिब्रिटी कडे अनेक पोलिस सिक्युरिटी देत असल्याचे मी अनेक वेळा पाहिले आहे. माझे राज्य शासनाला आवाहन आहे की त्या पोलिस सिक्युरिटीचे शासनाने पैसे घ्यावे आणि कोणालाही मोफत सिक्युरिटी देऊ नये. या समारंभात सुळे यांच्या हस्ते कर्तबगार पोलिसांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निकम, दक्षिण मुंबई राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, पदाधिकारी नितीन कदम, महेंद्र पानसरे आणि पोलीस बांधव उपस्थित होते.