
युवकांनी रक्तदानासोबत अवयवदानासाठी देखील पुढे यावे खासदार सुप्रिया सुळे !
युवकांनी रक्तदानासोबत अवयवदानासाठी देखील पुढे यावे खासदार सुप्रिया सुळे !
युवक नेहमीच रक्तदान करण्यासाठी पुढे असतात ही फार आनंदाची बाब आंहे पण आता युवकांनी रक्तदानासोबत अवयवदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच दक्षिण मुंबई राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन नारकर यांच्या महालक्ष्मी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करताना केले. त्या पुढे म्हणाल्या अवयवदानाच्या जनजागृतीसाठी शासनाच्या माध्यमातून नवीन प्रोसेस बनवण्यासाठी कार्य सुरू असून लवकरच त्याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर होतील. नारकर यांचे कार्य मी जवळून पाहिले असून आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे माझ्या हस्ते उदघाटन याचा मला फार आनंद आहे. यापुढे ही ते अशाच प्रकारे जोमाने समाजकार्य करतील अशी अपेक्षा करते.
मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई मध्ये रक्ताचा तुडवडा निर्माण झाला होता. याबाबत मुख्यमंत्री महोदय यांनी रक्तदान शिबिराचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार आमच्या पक्षाच्या वतीने दक्षिण मुंबईत सर्व प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तदानाचा साठा जमा झाला असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा झाला. त्यामुळे अनेक जणांचे जीव वाचण्यास मदत झाली यापुढे देखील आम्ही प्रत्येक प्रभागात पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांनी दिली. या समारंभात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निलेश भोसले, धनंजय बरदाडे, विजय यादव, नितीन कदम, महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, जिल्हाध्यक्षा वैशाली कडणे, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.