
सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानक दुर्लक्षित !
ओरस: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील "सिंधुदुर्ग नगरी" हे कोकण रेल्वे चे मुख्य स्थानक असून या ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालये असून येथे कायमच वर्दळ असते. नागरिकांना तेथे पोहचण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे "सिंधुदुर्ग नगरी" मात्र तेथे कोकण रेल्वेच्या ठराविक गाडया थांबतात.
मार्च २०२० पासून लॉकडॉऊन जाहीर झाल्यानंतर या स्थानकात वाय फाय, कॅन्टीन, सर्व सुविधा बंद आहेत. रेल्वे तिकीट ही दिली जात नाही. तिकिटांची मागणी केल्यास कुडाळ किंव्हा कणकवली स्थानकात जा अथवा नेट वरून तिकिटे काढा असे सांगितले जाते. तसेच जवळच असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिकिटे घ्या असेही सांगतात. पोस्ट कार्यालयातही तीच परिस्थिती आहे. तेथेही लॉकडाउन पासून नेट बंद मुळे रेल्वे तिकिटे देत नाहीत.
शासकीय कर्मचारी व ओरस नागरिक मात्र रेल्वे सुविधा पासून वंचित आहेत. ओरस नगरीत येणार-यांना फारच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष वेधून सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्थानकात सर्व सुविधा सुरू कराव्यात अशी कुडाळवासीयांची विनंती आहे.