
झोपू योजनेतील घर भाड्याने दिल्यास कारवाईची शक्यता ?
झोपू योजनेतील घर भाड्याने दिल्यास कारवाईची शक्यता ?
झोपडपट्टी पुनर्विकास योजने (एस आर ए) अंतर्गत मिळालेले घर जर घरमालकाने भाडेतत्त्वावर दिले असेल तर त्याची मालकी पात्रता रद्द होऊ शकते अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली. राज्य सरकार आवास मंत्रालय विभागातर्फे एस आर ए विभागाला सूचित करण्यात आलेले आहे कि, एस आर ए अंतर्गत ज्या झोपडपट्टीचा पुनर्विकास झाला असेल त्या ठिकाणच्या झोपडीधारकांना इमारतीमध्ये मालकी हक्काची घरे मिळाली असतील पण स्वतःचे झोपडी मालक सरकारने या सारे योजने अंतर्गत दिलेल्या घरांमध्ये राहत नसतील आणि त्यांनी जर घर भाड्याने दिल्या असल्यास तर त्यांची संबंधित घरा संबंधातील मालकीहक्क रद्द होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.
त्याचप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प योजनेसाठी जे कोणी घर खाली करत नसल्यास संबंधितांवर ३d कलम ३३ आणि ३४ अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण विभागामार्फत कारवाई करण्यात येईल.