
शिवसेना रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद !
शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने मेट्रो येथील लॉर्ड हॅरीस शाळा येथे नुकतेच भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास बेरोजगार युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन रोजगार मेळावा यशस्वी केला.
या रोजगार मेळाव्यात १५०० पेक्षा जास्त युवक युवती सहभागी झाले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित आस्थापनामध्ये अनेक रिक्त पदासाठी तरुण तरुणींना संधी उपलब्ध करून देण्यात आली. ४८२ बेरोजगार युवकांना थेट मुलाखत घेऊन त्यांना लगेच नोकरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच २ युवकांना जर्मनी येथील तुर्व्हे इनलँड या कंपनीत नोकरी मिळाली. या रोजगार मेळाव्यामध्ये विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी बेरोजगार तरुणांना व्यवसायाच्या दृष्टीकोनातून मोलाचे मार्गदर्शन केले.
या रोजगार मेळाव्यात नोकऱ्या ह्या एल. आय. सी. तसेच विमा क्षेत्रातील सेल्स, मार्केटिंग, अकाऊंटस, ऑनलाईन आणि सुरक्षा रक्षक या विभागा मधल्या होत्या. या रोजगार मेळाव्यामध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन खासदार अनिल देसाई आणि खासदार अरविंद सावंत यांनी केले.
हा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शाखाप्रमुख आणि शिवसैनिक यांनी विशेष मेहनत घेतली.