
भंडारा जिल्हातील अग्निकांडात मृत्यु मुखी पडलेल्या चिमुकल्यांना सीएसटी स्थानकाबाहेर भावपूर्ण श्रद्धांजलि !
भंडारा जिल्हातील अग्निकांडात मृत्यु मुखी पडलेल्या चिमुकल्यांना सीएसटी स्थानकाबाहेर भावपूर्ण श्रद्धांजलि !
भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झाले होते भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बाळांचा मृत्यू झाला होता रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री २ च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून ७ बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मुंबई प्रदेश दक्षिण मुंबई जिल्हा वतिने भंडारा जिल्हातील नवजात शिशु केअर युनिट अग्निकांडात मृत्यु मुखी पडलेल्या निष्पाप कोवळ्या चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली.
जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने भंडारा जिल्ह्यात नवजात शिशु केअर युनिटमध्ये अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप कवळ्या चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी भाटिया गार्डन वि टी स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कॅन्डल मार्च काढण्यात आला. त्या कॅन्डल मार्च चे आयोजन मुंबई प्रदेश सचिव विजय जाधव यांनी केले.
सदर कार्यक्रमात महिला प्रमुख वैशाली संगारे लाड, राम जाधव, विशाल गायकवाड, विलास सकपाळ, विशाल जॉजाळ, जुलेखा अकबर शेख, दिलीप उन्हाळेकर, महेंद्र माने, गुलाब रोकडे, संदेश निकम, त्याचप्रमाणे भायखळा तालुका अध्यक्ष शिरीष चिखलकर आदी मान्यवर उपस्थित होते.