
शिवसेनेतर्फे बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळावा !
शिवसेनेतर्फे बेरोजगारांसाठी भव्य रोजगार मेळावा !
दक्षिण मुंबईतील बेरोजगार युवक आणि युवतींसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयांतीनिमित्त शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने शनिवार दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ३ या वेळेत लॉर्ड हॅरिस महापालिका शाळा , जी. टी रुग्णालया शेजारी, मेट्रो, मुंबई - ०२ येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्याचे खास आकर्षण म्हणजे बेरोजगार युवकांना मुलाखत झाल्यावर त्याच ठिकाणी विविध कंपन्यांचे नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. यामध्ये पेन इंडिया फूड, अलोकां एक्स्पोर्ट, आनंद राठी, गुनानिया वोडाफोन, लूप मोबाइल, पेस सेटर, हमिंग बर्ड, एक्सिस बँक, फर्स्ट फ्लाईट कुरिअर, रिलायबल बिजनेस सौलूषन, कॅफे कॉफी डे, हिमेश फूड, आय टी सोलूषन यासारख्या विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या रोजगार मेळाव्यामध्ये नववी पास / नापास ते पदवीधर, इंजिनियरिंग, आय टी आणि आय टी आय शैषणिक पात्रता असणारे युवक, युवती सहभागी होऊ शकतात. उमेदवाराने रोजगार मेळाव्याला येताना आपल्या बायो डेटाच्या १० प्रती, ५ फोटो आणि निवास स्थळ, आधार कार्ड पुराव्याची एक झेरोक्स प्रत आणावी. सध्या कोरोना संकटामुळे अनेक युवकांच्या आणि युवतींच्या नोकर्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होणे फार कठीण झाले आहे. अशा संकटसमयी शिवसेना नेहमीच मुंबई करांसोबत असते त्यामुळे आम्ही हा भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून युवकांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे. या मेळाव्याला नाव नोंदणी करण्यासाठी मिलिंद झोरे - 7045416245, महेंद्र कांबळे 9819046203 - यांच्याशी संपर्क साधावा.