
भाजपा नगरसेविका सुनीता मेहता यांनी महिलांना वाटले मोफत अग्नी सुरक्षा कवच !
भाजपा नगरसेविका सुनीता मेहता यांनी महिलांना वाटले मोफत अग्नी सुरक्षा कवच !
भाजपा नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी इरला येथील महिलांना अग्निसुरक्षा सप्ताहनिमित्त मोफत अग्नी सुरक्षा कवचाचे वाटप केले. या कार्यक्रमात अग्निशमन दलाचे अधिकारी एस के बंडगर यांनी महिलांना आग लागल्यावर घाबरून न जाता त्या आगीचा सामना करून आग कशी विझवावी याबाबत प्रात्यक्षिक दिले.
नगरसेविका सुनिता मेहता यांनी स्वतः फायर फायटिंग मशिनद्वारे आग विझवण्याचे प्रात्यक्षिक केले. या समारंभात महिलांना आग विझवण्याबाबत जनजागृती करून प्रात्यक्षिक देखिल देण्यात आले. आम्ही घरी एकटेच असतो आशा वेळी गॅस सिलेंडरला आग लागल्यास ती आग कशी विझवावी याचा आज मला प्रत्यक्ष अनुभव आला त्यामुळे माझ्या मनातील आगीबाबतची भीती निघुन गेली. नगरसेविका सुनीता मेहता यांनी हे शिबिर घेतल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अशी माहिती विभागातील रहिवाशी संगीता पाटील यांनी दिली. आम्ही विभागातील नागरिकांना आगीची घटना घडल्यास घाबरून न जाता कशा प्रकारे त्या आगीला समोरून प्रतिकार करावा याबाबत प्रात्यक्षिक देऊन त्यांना मार्गदर्शन केले त्यामुळे महिलांच्या मनातील आगीविषयी असणारी भीती निघून गेली यापुढे देखील आम्ही अनेक विषयावर शिबिरे घेणार असल्याची माहिती भाजपा उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश मेहता यांनी दिली.
या कार्यक्रमात विभागातील महिला, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान आणि एचपी गॅस एजन्सीचे अवल सिंग नेगी आणि कर्मचारी उपस्थित होते.