सावित्री उत्सव निमित्ताने सावित्री वदते पुस्तकाचे व राष्ट्र सेवादल दिनदर्शिका चे प्रकाशन संपन्न..

सावित्री उत्सव निमित्ताने सावित्री वदते पुस्तकाचे व राष्ट्र सेवादल दिनदर्शिका चे प्रकाशन संपन्न..

      राष्ट्र सेवा दलाच्या वतीने मुंबईच्या अनेक भागात सावित्री उत्सव दिनांक ३ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. चेंबूर, सातरस्ता, शाखा तसेच गोरेगाव व मालवणी शाखेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात सेवादल कार्यकर्त्यांनी चळवळीचे गाणे गावून सावित्री फुले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सावित्रीच्या लेकी नावाचा पुरस्कारांचा वितरण करण्यात आला.   

        यात कोरोनाकाळात विशेष काम केलेल्या नायर रुग्णालयातील प्रिया बांदेकर यांना तर लॉकडाऊन रिलीफ प्रोजेक्ट या स्वयंसेवी संस्थेला. तसेच  कोरोनाकाळात धान्य, जेवण, औषधे आणि रुग्ण शोधण्याच्या कामात मालवणी परिसरात काम करणाऱ्या वैशाली महाडिक आणि सफाई कामगार म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कल्पना राकेश रुडे यांना  या यंदाचा सावित्रीच्या लेकी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नायर रुग्णालयातील सर्व नर्सेसच्या वतीने प्रिया बांदेकर आणि लॉक डाऊन रिलीफ प्रोजेक्ट च्या वतीने मितवा मुक्ता अनीश यानी पुरस्कार स्वीकारले. सुधीर देसाई यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते सावित्री राष्ट्र सेवादलाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन पार पडले.

     पुरस्कार प्राप्त स्त्रियांशी ज्ञानदा खोत यांनी गप्पा मारल्या तसेच दुसरा कार्यक्रमात राष्ट्र सेवा दल कार्यालय, मालवणी, मालाड येथे दि. ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या वैशाली महाडिक आणि सफाई कामगार कल्पना रुडे यांच्याशी सिरत सातपुते यांनी गप्पा मारल्या तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड ए. सी. श्रीधरन आणि टिव्ही न्युज अँकर सोनाली शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रसंगी राष्ट्र सेवादल मुंबई अध्यक्ष शरद कदम, सिरत सातपुते, रुबिना खान, लालजी कोरी, संतोष चिकणे आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच मोठया संख्येने सेवादल सैनिक उपस्थित होते. तसेच प्रणिता वारे, रेश्मा खाडे लिखित सावित्री वदते या पुस्तकाचे प्रकाशन व राष्ट्र सेवा दलाच्या दिनदर्शिकेचे ही प्रकाशन पार पडले.

      राष्ट्र सेवा दल, मुंबईच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या महिलांना सावित्रीच्या लेकी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week