
रे रोड स्मशानभूमीचा मंच धोकादायक, कधीही पडण्याची शक्यता !
रे रोड स्मशानभूमीचा मंच धोकादायक, कधीही पडण्याची शक्यता !
दक्षिण मुंबईतील रे रोड येथील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रे रोड स्मशानभूमी चा मंच धोकादायक स्थितीत आहे तो कधीही पडून जीवितहानी होऊ शकते. अशी माहिती रिपाई भायखळा तालुका अध्यक्ष श्री. शिरीष चिखलकर यांनी दिली. भायखळा पूर्व येथील लव लेन, तुळशी वाडी, माझगाव पोस्ट ऑफिस, कॉटन ग्रीन कंपाऊंड, म्हातार पाखडी, रेल्वे कॉटर्स, पोलीस वसाहत त्याचप्रमाणे नयानगर, मापलावाडी, तुळशीवाडी, ताडवाडी आदी ठिकाणांच्या रहिवाशांना जवळ असलेली रे रोड स्मशानभूमी ही एकमेव स्मशानभूमी आहे. मा. आमदार मधु अण्णा चव्हाण यांच्या फंडातून या स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले होते.
त्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी आणि लाकडी अग्नि दाहिनी या ठिकाणी जो सिमेंट काँक्रीट चा मंडप करण्यात आलेला आहे, त्याला सध्या टेकू लावण्यात आलेले असून तो सध्या धोकादायक स्थितीत आहे सदरचा मंच केव्हाही ढासळून पडू शकतो व यामुळे अंतिम यात्रेसाठी येणाऱ्या पादचाऱ्यांना याचा फटका बसू शकतो, असे चिखलकर यांनी सांगितले.