
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने आपत्तीशी लढण्याकरता मुंबईत प्रथमच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर प्रभाग क्र.२०४ चे नगरसेवक अनिल कोकीळ यांनी लालबाग मधे आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी यांच्या उपस्थित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात विभागातील महिलांना आणि नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रात्यक्षिक देऊन संपूर्ण माहिती देण्यात आली समजा एखादी अपरिचित घटना घडून आग लागली तर ती कशी शमवावी याबाबत पूर्ण प्रशिक्षण घेण्यात आले हे प्रशिक्षण घेऊन नागरिक आपात्कालीन परिस्थितीत उद्भवलेला घटनेचा सामना करू शकतील.
या कार्यक्रमाला प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, शाखाप्रमुख किरण तावडे, महिला शाखा संघटक कांचन घाणेकर, प्रभागातील रहिवाशी आणि शिवसैनीक उपस्थित होते.