भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मानवंदना...

भीमा कोरेगावच्या विजय स्तंभास ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची मानवंदना...

       (वार्ताहर - विश्वास गायकवाड) भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवार दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी मानवंदना दिली. १ जानेवारी १८१८ रोजी या ठिकाणी घनघोर ऐतिहासिक लढाई झाली होती. या लढाई मध्ये ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांचा पराभव केला होता. महापराक्रमी महार सैनिकांच्या या अलौकिक अद्वितीय ऐतिहासिक आणि शौर्याच्या चीर स्मृती कायम जपण्यासाठी आणि या ऐतिहासिक  लढ्याच्या स्मरणार्थ तत्कालीन ब्रिटिश सरकारने या रणभूमीवर अर्थात पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या तीरावर भीमा कोरेगाव या ठिकाणी दगडी चीर्यांचा वापर करून भव्य अशा  विजय स्तंभाचे निर्माण केले होते. आपल्या पुर्वज महापराक्रमी शूर वीरांच्या या शौर्य स्मृती स्तंभाला मोठ्या आदराने मानवंदना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी १ जानेवारी रोजी या ठिकाणी आवर्जून येत असत. 

     दरवर्षी या ठिकाणी १ जानेवारी ला संपूर्ण देशभरातून संपूर्ण बहुजन समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या विजय स्तंभाला मोठ्या अभिमानाने मानवंदना देऊन अभिवादन करत असतात. 

      या वर्षी शुक्रवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. पुणे येथील भीमा कोरेगाव येथे येऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मोठ्या अभिमानाने सन्मान पूर्वक मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, वंचितचे नेते अशोक सोनोने, प्रवक्ते अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक व प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते. स वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवार दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी मानवंदना दिली. १ जानेवारी १८१८ रोजी या ठिकाणी घनघोर ऐतिहासिक लढाई झाली होती. या लढाई मध्ये ५०० महार सैनिकांनी २८ हजार पेशव्यांचा पराभव केला होता. महापराक्रमी महार सैनिकांच्या या अलौकिक अद्वितीय ऐतिहासिक आणि शौर्याच्या चीर स्मृती कायम जपण्यासाठी आणि या ऐतिहासिक  लढ्याच्या स्मरणार्थ तत्कालीन ब्रिटिश सरकारने या रणभूमीवर अर्थात पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या तीरावर भीमा कोरेगाव या ठिकाणी दगडी चीर्यांचा वापर करून भव्य अशा विजय स्तंभाचे निर्माण केले होते. आपल्या पुर्वज महापराक्रमी शूर वीरांच्या या शौर्य स्मृती स्तंभाला मोठ्या आदराने मानवंदना देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी १ जानेवारी रोजी या ठिकाणी आवर्जून येत असत. 

     दरवर्षी या ठिकाणी १ जानेवारी ला संपूर्ण देशभरातून संपूर्ण बहुजन समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या विजय स्तंभाला मोठ्या अभिमानाने मानवंदना देऊन अभिवादन करत असतात. 

      या वर्षी शुक्रवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. पुणे येथील भीमा कोरेगाव येथे येऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय स्तंभास मोठ्या अभिमानाने सन्मान पूर्वक मानवंदना दिली. यावेळी ज्येष्ठ नेते वसंत साळवे, वंचितचे नेते अशोक सोनोने, प्रवक्ते अमित भुईगळ, वंचितचे नगरसेवक व प्रवक्ते आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, देवेंद्र तायडे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील आदी उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week