सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा विश्वास सार्थ ठरेल - भाई जगताप (मुंबई काँग्रेस अध्यक्ष)

सोनिया गांधी, राहुल गांधी यांचा विश्वास सार्थ ठरेल - भाई जगताप (मुंबई काँग्रेस अध्यक्ष)

     काँग्रेस पक्षाचे प्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी सार्थ ठरवेन, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी येथे बोलताना दिली. सोमवारी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी पदभार स्वीकारल्यानंतर आमदार भाई जगताप यांचा सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथील डहाणूकर सभागृहात केला. त्यावेळी ते बोलत होते.

       मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पद मिळेल यासाठी गेल्या दहा वर्षापासून मी शर्यतीत होतो पण अखेर शर्यत जिंकली. आज  स्थापना दिवस आहे या दिवशी मी पदभार स्वीकारला मला काँग्रेसमध्ये 38 वर्षे झाली युवक काँग्रेस पासून मी काम करीत आहे.  कुठल्याही प्रकारची लालसा न ठेवतानाही काम केले आहे. आज काँग्रेस पक्षाला १३८  वर्षे झाली आहेत. नुसता पदभार स्वीकारणे म्हणजे महत्त्वाचं नाही तर पुढील आव्हानांची जबाबदारी माझ्यावर आहे. विशाल नेतृत्व मला मिळालेले आहे त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला कसे यश मिळेल यासाठी माझा लढा असेल. काँग्रेस पक्ष आगामी मनपा २०२२ च्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे काँग्रेस पक्षामध्ये पुनर चैतन्य निर्माण व्हावे यासाठी सातत्याने मी प्रयत्न करेन असे भाई जगताप यांनी सांगितले. सदर सत्कार समारंभ या कार्यक्रमास पत्रकार संघाचे सेक्रेटरी विष्णू सोनवणे, उपाध्यक्ष सुधाकर काश्यप, समाजसेवक कलीम अलवारे आदी मान्यवर उपस्थित होते.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week