
अंध बांधवांना मार्गदर्शक काठीचे वाटप !!
दिव्यांग आस्था प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा स्वतः दिव्यांग असून, संस्थेच्या माध्यमातून फेरीचा व्यवसाय करणा-या अंध बांधवाना मार्गदर्शक काठीचे वाटप सार्वजनिक नरदास नगर नवरात्रौत्सव सेवा मंडळ,भांडूप (प), मुंबई यांच्या वास्तुत करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विनोद साडविलकर (रूग्ण मित्र तथा कार्याध्यक्ष परिवहन मित्र सामाजिक प्रतिष्ठान) यांनी सामाजिक न्याय विभागाच्या व महानगर पालिकेतील विभागीय कार्यालयात कार्यरत समाज विकास अधिकारी यांच्या संपर्कात राहून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आणि ओंकार सेवा संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष महेंद्र भास्कर यांनी सढळ हस्ते मदत करणार असल्याचे सांगितले. वैभव जुवेकर, अनमोल जाधव,संस्थेचे कार्याध्यक्ष विनोद जावकर व संस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा रश्मी कदम यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. संस्थेच्या वतीने राकेश सुर्वे यांनी यथोचित सन्मान केला. काठी वाटपाबाबत प्रातिनिधिक स्वरूपात विश्वास मगरे यांनी संस्थेच्या अध्यक्षा रश्मी कदम यांचे आभार मानले.