राज्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, जाणून घ्या नियम काय सांगतात !

राज्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, जाणून घ्या नियम काय सांगतात !

          ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर राज्यात 22 डिसेंबरपासून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय. विशेष म्हणजे ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत राहणार असून, त्यासाठी नियमावलीही जाहीर झालीय. नाइट कर्फ्यूदरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई आहे, पण संचाराला बंदी नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

      -नागरिक कामानिमित्त बाहेर पडू शकतात, कर्फ्यू हा सुरक्षा आणि आरोग्यासाठी असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध लादण्यात आले आहेत. नाइट शिफ्टमधील व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर 11 वाजता बंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

      दुचाकी आणि चारचाकी वाहनांतून प्रवास करता येणार त्याव्यतिरिक्त अन्य व्यवसायाला तसेच सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली असून, नागरिक दुचाकी आणि चार चाकी वाहनांतून प्रवास करू शकतात. मात्र कारमध्ये चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. कर्फ्यूच्या वेळी फिरायला जाऊ शकता किंवा गाडी चालवू शकता. पण फक्त पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. नागरिकांनी मास्कचा वापर करीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणं गरजेचं आहे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय. 

    महाराष्ट्रात मध्यपूर्वेतून येणारे नागरिक १४ दिवस क्वारंटाईन.

    संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने