वैशाखी वादळवारा काव्य महोत्सव पुरस्कार सोहळा संपन्न !!

वैशाखी वादळवारा काव्य महोत्सव पुरस्कार सोहळा संपन्न !!

       पुणे येथे दरवर्षी वैशाखी वादळवारा काव्यमहोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत असतो; यांचे मुख्य आयोजक ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड हे काव्य महोत्सव दरवर्षी भरवतात. महाराष्ट्रातील लेखक कवी विविध क्षेत्रातील मान्यवर यात सहभागी झाले होते.

       काव्य महोत्सवाचे उद्घाटन प्रा. प्रतिभा काळे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनिस, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, प्रा. डॉ. शैलेंद्र भणगे, सूर्यकांत तिवडे, कुलसचिव सोलापूर विद्यापीठाचे डॉ. शिवाजी शिंदे , माणदेश कविवर्य डॉ. लक्ष्मण हेंबाडे, कवी लक्ष्मण शिंदे, कवी नानाभाऊ माळी, निवेदक रानकवी जगदीप वनशिव हे मान्यवर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण कवी चंद्रकांत जोगदंड यांनी केले. मान्यवरांनी आप आपली मनोगते व्यक्त केली.

 काव्य मैफिलीचे अध्यक्ष प्रा. डॉ. शैलेंद्र भणगे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य मैफिल रंगली, बातमीकारच्या पत्रकार कवियीत्री प्रीती तिवारी, पल्लवी उमरे, गौसपाक मुलाणी, मोहन वायकोळे, गिरीधर इंगोले, अमीर पटेल, लोककवी सिताराम नरके, आनंद गायकवाड, सागर काकडे, राहुल भोसले, जनाबापू पुणेकर छगन वाघचौरे, उज्वला वडनेरे, डॉ. तारा चौधरी, सागर काकडे, दिनेश गायकवाड, जित्या जाली, बबन धुमाळ, किशोर टिळेकर, प्रा. सूर्यकांत नामगुडे, ऋषिकेश भोसले, शाहीर शिवाजी थिटे, रूपाली शिंगे, सुभाष बामणे, बाळकृष्ण बाचल इत्यादी कवीनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या.

       या रंगतदार काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप यांनी आपल्या दमदार आवाजात बहारदार काव्य मैफिल रंगवली. पुणे येथील एस एम जोशी सभागृहात काव्य महोत्सव सोहळा संपन्न झाला.

         सौजन्य : जगदीप वनशिव


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week