
टॉवरवर मराठी हवी !!
पुनर्विकासात खाजगी गिरण्यांच्या जागा इत्यादी जागेवर मोठमोठ्या इमारती टॉवर झाले आहेत. या टॉवर आणि प्रवेशद्वारांवर इंग्रजीमध्ये सह नावे लिहिलेली आहेत. तरी ज्या प्रकारे दुकानांच्या पाट्यांवर मराठीमध्ये लिहिण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सरकारने कायदा केला. परंतु त्याच्या विरोधात जनहित याचिका करण्यात आली असता, न्यायालयाने मराठी पाट्या असाव्यात असा निर्णय दिला आहे.
तरी आता टॉवर आणि प्रवेशद्वारांवर इंग्रजी बरोबर तेवढ्याच आकाराच्या पाट्या, मराठी नावे लिहिण्यात यावी. नाहीतर त्याकरिता आंदोलन करण्याची वेळ येऊ नये.
मराठी माणसाची एकजूट झालेली आहे. त्यामुळे त्वरित संबंधितांनी इंग्रजी बरोबर मराठी मध्ये नावे लिहावीत.