बातमीकार चा दणका !
मुंबई काँग्रेस कार्यालय यासह इतर पक्ष कार्यालय असलेल्या या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आलेली आहे. 22 डिसेंबर रोजी बातमीकार डॉट कॉम साइटवर आलेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या ठिकाणची रस्ते गटारे आणि शौचालयांची दुरुस्ती हाती घेण्यात आलेली आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर ड्रेनेज लाईन आणि घाण पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार स्थानिकांनी दिल्यानंतर याबाबतचे वृत्त बातमीकार मध्ये छापण्यात आले. त्यानंतर याची तात्काळ दखल प्रशासनाने घेतले ह्यामुळे बातमीदार डॉट कॉम चे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.