
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ राजेन्द्र अग्रवाल यांना कोरोना योद्धा पुरस्काराने केले सन्मानित !
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ राजेन्द्र अग्रवाल यांना कोरोना योद्धा पुरस्काराने केले सन्मानित !
इंटरनेशनल मारवाडी फेडरेशनच्या वतीने नुकतेच राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वतीने कोरोना योध्दाना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना योध्दा बांधवांनी केलेल्या कामाची दखल भारतातील सर्वच नागरिकांनी घेतली असून त्यांना सन्मानित करणे आणि त्यांचा उत्साह वाढवणे हे माझे परम कर्तव्य असून अशा लोकांना माझ्या हस्ते सन्मानित करण्याचे हे मी माझे भाग्य समजतो असे जाहीर प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले रोटरी क्लबचे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ. राजेंद्र अग्रवाल हे गेली अनेक वर्षापासून समाजसेवेमध्ये कार्य करत असून त्यांनी नागरिकांना अनेक आरोग्य सेवा पुरवल्या आहेत. तसेच त्यांनी तळागाळातील गरीब नागरिकांना देखील आरोग्य विषयक सेवा रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिले आहेत. त्यांच्या या सेवेचा तळागाळातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून त्याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या या समाज कार्याला मी धन्यवाद देतो आणि यापुढेही त्यांनी असेच कार्य सुरू ठेवावे अशी आशा बाळगतो या कार्यक्रमात अनेक कोरोना योध्दाना मानसन्मान देऊन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या समारंभात रोटरी क्लबचे पदाधिकारी पोलीस दलातील अधिकारी शासनातील पदाधिकारी आणि मारवाडी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.