वाफ घेतल्याने कोरोना आजार बरा होतो, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे प्रतिपादन !

वाफ घेतल्याने कोरोना आजार बरा होतो, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे प्रतिपादन !

            गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतात पूर्ण रोगाने थैमान घातले असून त्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन करावा लागला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली. सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घ्यायला होणारा त्रास हा स्टीमर द्वारे वाफ घेतल्याने कमी होतो. असे आढळून आले आहे. तरी माझी मुंबईकरांना विनंती आहे त्यांनी स्टीमचा वापर दैनंदिन जीवनात रोज करावा. या स्टिमरचा काही साईड इफेक्ट नसून याने करोना आजाराची लक्षणे पूर्णपणे बरे होतात अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. ऑरचिड कँसर ट्रस्टचे पदाधिकारी आणि प्रसिद्ध ओंको सर्जन डॉ. रुसी भल्ला आणि त्यांच्या टीमने नुकतीच आरोग्य राज्य मंत्री यांची भेट घेऊन त्यांना गुरुकृपा हार्ट सेंटरचे संचालक, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ गजानन रत्नपारखी यांच्या मार्फत त्यांना स्टीमर दिले. तसेच त्यांना स्टीमर बाबत जनजागृती करण्याबाबत निवेदन दिले. हे निवेदन आरोग्य राज्य मंत्री यांनी स्वीकारून आपण लोकांना मोफत स्टीमर वाटले तसेच आपण स्टीमर द्वारे अनेक लोकांचे जीव वाचवले याची मला पूर्णपणे माहिती आहे. मी नक्कीच आपल्याला सहकार्य करेन असे आश्वासन त्यांनी दिले. आम्ही कोरोना रुग्णांना स्टीमर द्वारे बरे केले आहे त्यात पोलिस, महापालिका कर्मचारी, कोविड योद्धा यांचा देखील समावेश आहे.

           आम्ही राज्य सरकारसोबत कोरोना आजार रोखण्यासाठी काम करण्यास नेहमीच तयार असून आपण फक्त हाक द्यावी आम्ही साथ द्यायला नेहमीच तयार आहोत. अशी माहिती प्रसिद्ध लेजर सर्जन डॉ. रुसी भल्ला यांनी दिली. या भेटीमध्ये कोरो लो स्टीमर टीमचे संचालक नानू भाई जरीवाला, ईश्‍वरलाल मोरया आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week