गोरेगाव पूर्वच्या नगरसेविका प्रिती साटम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन !

गोरेगाव पूर्वच्या नगरसेविका प्रिती साटम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन !

          मौजे पहाडी गोरेगाव सिटीएएस नंबर 596 मोहन गोखले रोड धीरज वॅली टॉवर्स समोर ना विकास क्षेत्रातील राखीव भूखंडावर गेल्या अनेक महिन्यापासून टाळेबंदी चा फायदा उठवून मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत वाहनतळ उभा करण्यात आला असून यासाठी महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नाही त्याचप्रमाणे या जागेवरती अनधिकृतपणे गॅरेज, भराव व झाडांची कत्तल या वाहनतळासाठी करण्यात आलेली आहे महापालिकेकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा हा वाहनतळ आजही सुरू आहे. यासंदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यांमध्ये संबंधितां विरोधात गुन्हा दाखल होऊन सुद्धा आजही हा अनधिकृत वाहनतळ सुरू असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हॅनिटी व्हॅन व अन्य गाड्यांचे पार्किंग होत आहे.

            त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असुन त्यांच्या तक्रारीवरून यासंदर्भात स्थानिक नगरसेविका प्रीति साटम यांनी अनेक महिने महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा करून सुद्धा समाधानकारक कारवाई होत नाही. या अनधिकृत वाहनतळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असुन त्यांच्या मधे असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. नागरिकांच्या या संतप्त भावनेची दखल घेऊन या विरोधात गोरेगाव प्रभाग क्रमांक 52 मधील नागरिकांच्या समवेत बुधवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता महापालिकेच्या पी दक्षिण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून याठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येणार आहे तसेच जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

         असा इशारा नगरसेविका प्रीति साटम यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या वतीने दिला आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week