
नगरसेविका आफरिन शेख यांनी वाटले मास्क आणि आर्सेनिक अलबम !
नगरसेविका आफरिन शेख यांनी वाटले मास्क आणि आर्सेनिक अलबम !
माजी खासदार, केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने मसजीद बंदर येथे नगरसेविका आफरिन शेख आणि काँग्रेसचे युवा नेते उमर लकडावला यांनी विभागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वाटप केले. या कार्यक्रमात विभागातील नागरिक आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही नेहमीच नागरिकांसाठी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे सॅनिटायझर, मास्क आणि आर्सेनिक अल्बम या गोळ्याचे मोफत वाटप केले असून यापुढेही आमच्याकडून विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका आफरिन शेख आणि युवा नेते उमर लकडावला यांनी दिली.