शिवसेना, भाजपा पक्षाचे नेते करणार कुलाबा काँग्रेस युवा नेत्यांची निवड !

शिवसेना, भाजपा पक्षाचे नेते करणार कुलाबा काँग्रेस युवा नेत्यांची निवड !

           महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत काँग्रेस पक्षाच्या पक्षांतर्गत असलेल्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे युवा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच ही निवडणुक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. या निवडणुकीत  युवक, युवतींची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 18 ते 35 वयोगटातील तरुण-तरुणी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सभासद होऊन  आपल्या आवडीच्या उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने मतदान करू शकतात. मतदानाची रंगत एवढी रंगली आहे की या मतदानासाठी उमेदवाराचा प्रचार चक्क शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते व्हाट्सअप आणि फेसबुकवर ग्रुपच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. त्यातच कुलाबा विभागातील कुलाबा तालुका विभागात उमेदवाराच्या प्रचाराकरिता व मतदाना करिता शिवसेना, भाजपा पक्षाचे बडे कार्यकर्ते, नेते आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना काँग्रेसचे ऑनलाईन सदस्य होऊन मतदान करण्यासाठी सांगत आहेत. मुळात ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत होत असताना मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या निवडीच्या कार्यकर्त्याला पक्षात पाठवून काँग्रेस पक्षाची कणा, परंपरा आणि शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि जबाबदार पदाधिकारी यांनी लक्ष न दिल्यास काँग्रेस पक्षाला भविष्यात फार मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

        काँग्रेस पक्षाच्या  निवडणुकीत इतर राजकीय पक्षांचा हस्तक्षेप चुकीचा असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असून त्यांची चुकीच्या पद्धतीने मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मनात एक शंका निर्माण होत आहे की या निवडणुकीत  शिवसेना-भाजपा पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काँग्रेसच्या युवा नेत्यांची निवड तर करणार नाही ना? अशी चर्चा कुलाबा विभागातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि मतदार यांच्यात रंगताना दिसत आहे.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week