समाजसेविका माधुरी मेटांगे यांनी कचरावेचक महिलांना वाटला दिवाळी फराळ !

समाजसेविका माधुरी मेटांगे यांनी कचरावेचक महिलांना वाटला दिवाळी फराळ !

          लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा माधुरी मेटांगे यांनी नुकतेच दिवाळी निमित्ताने कचरावेचक महिलांना गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साखर, डाळ, हळद, मिरची पावडर आणि फराळ वाटप उपक्रमाचे आयोजन नुकतेच मुलुंड केले होते.

      त्यास विभागातील महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी महेंद्र आटोले आणि मनीषा आटोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

       या कार्यक्रमात उपस्थित महिलांना बचत गटाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली तसेच अनेक महिलांनी उस्फुर्तपणे बचटतगट तयार करण्यासाठी नावे नोंदविली.

   या कार्यक्रमासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे सचिव संदीप लेले, नगरसेविका मृणालताई पेंडसे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. सर्व लक्षभेदीच्या सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. आम्ही समाजातील लोकांसाठी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतो. महिलांना आपल्या पायावर उभे करून त्यांना रोजगार देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याची माहिती समाजसेविका माधुरी मेटांगे यांनी दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week