
आमदार यामिनी जाधव यांनी लावणी कलावंतांना वाटले दिवाळी साहित्य !
आमदार यामिनी जाधव यांनी लावणी कलावंतांना वाटले दिवाळी साहित्य !
महाराष्ट्राच्या लोककलेची राणी म्हणजे लावणी, मुंबई लावणी महासंघाच्या सदस्यांना भायखळ्याच्या आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्यावतीने नुकतेच दिवाळी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी भायखळा विधानसभा संघटक विजय लिपारे, हेमंत मयेकर उपस्थित होते. कोरोना मुळे अनेक जणांचा रोजगार बुडाला आहे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांना उदरनिर्वाह करणे फार कठीण झाले आहे. त्यामुळे लावणी कलावंतांची दिवाळी आनंदात जावी यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पुढाकाराने आम्ही त्यांना दिवाळी साहित्य वाटप करत असल्याची माहिती आमदार यामिनी जाधव यांनी दिली.
लावणी नृत्यांगना, वादक, पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ आदींना देखील हे साहित्य वाटप करण्यात आले.