
नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी दिवाळीनिमित्त वाटल्या पणत्या !
नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी दिवाळीनिमित्त वाटल्या पणत्या !
दिवाळीनिमित्त प्रभाग क्रमांक 70 च्या नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी विभागातील नागरिकांसाठी मोफत पणत्या वाटपाचा कार्यक्रम नुकताच इरला येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये करण्यात आला. या समारंभामध्ये उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राजेश मेहता यांनी विभागातील नागरिकांना मोफत पणत्या आणि दिवाळी भेट वस्तु यांचे वाटप केले. राम जन्मभूमी वर अयोध्या मंदिर होणार असल्यामुळे आता या दिवाळीला फार मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळेच एक पणती प्रभू श्रीरामाचे नावे या योजनेला भारतात सर्व ठिकाणी सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतातील सर्व घरा घरात प्रभू श्रीरामाचे नावे एक पणती ठेवण्याचा मानस जाहीर केला आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 70 च्या नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी प्रभागातील नागरिकांना मोफत पणत्या यांचे वाटप केले.
आम्ही दरवर्षी दिवाळीला विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतो परंतु यावर्षी करोनाच्या आजारामुळे कार्यक्रम घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग चे पालन करून आम्ही आमच्या प्रभागात हा मोफत पणत्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचा विभागातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी केले आहे.