कोकणस्थ (सं) वैश्यवाणी समाजाच्या वतीने पोलीस कोविड योध्याचा गौरव !

कोकणस्थ (सं) वैश्यवाणी समाजाच्या वतीने पोलीस कोविड योध्याचा गौरव !

          गिरगाव येथे गेली १३३ वर्षे कार्यरत असलेली कोकणस्थ (सं) वैश्यवाणी समाजाच्या यांच्या वतीने पोलीस कोविड योध्याचा गौरव करण्यात आला.    संस्थेचे पदाधिकारी यांनी ना म मार्ग पोलीस ठाणे येथे नुकतीच भेट देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक - थोरात यांना औषधी सामुग्री देण्यात आली. 

       संस्थेने सामाजिक  बांधिलकी उपक्रमा अंतर्गत, कोविड १९ महामारीच्या रणसंग्रामात पोलिसांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता नागरिकांच्या जीविताचे रक्षण केले. त्यामुळे कोकणस्थ (सं) वैश्यवाणी समाजाच्या वतीने पोलीस कोविड योध्याचा गौरव करण्याचे ठरविले. संस्थेने  ना म जोशी मार्ग पोलीस ठाणे, भायखळा पोलीस ठाणे, भोईवाडा पोलीस ठाणे, काळाचौकी पोलीस ठाणे, आग्रीपाडा पोलीस ठाणे,  यांना भेटी देऊन त्यांच्या निरोगी व सदृढ आरोग्यासाठी औषधी सामुग्री भेट देऊन त्यांच्या कार्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्या. तसेच नाना पालकर स्मृती संस्था (सुपारीबाग), संत गाडगे महाराज ट्रस्ट (परेल) यांनाही भेट देऊन औषधाचे वाटप करण्यात आले. 

          कोकणस्थ (सं) वैश्यवाणी समाजाच्या वतीने अध्यक्ष- विजय हेगिष्टे, उपाध्यक्ष- भाई शेट्ये, चिटणीस - जागृती गांगण, खजिनदार- प्रदीप गांगण, विश्वस्त- अनिरुद्ध शेट्ये, मेघना थरवळ, विद्याधर शेट्ये, पोलीस निरीक्षक - संतोष भालेकर, माजी चिटणीस - प्रदीप गांगण, पत्रकार सुरेश गांगण तसेच व्यवस्थापक पंच मंडळ उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week