शिव भारतीय पोर्ट्स सेना कार्यालयाचे झाले उदघाटन !

शिव भारतीय पोर्ट्स सेना कार्यालयाचे झाले उदघाटन !

      मुंबई शिवसेना खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक मधील सर्व कामगारवर्ग व असोसिएशनने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शिवसेनेच्या छत्राखाली येऊन, विविध १४ संघटनांना एकत्र घेउन शिव भारतीय पोर्टस सेना या संघटनेची स्थापना खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते केली. तसेच संघटनेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

      या प्रसंगी खासदार अरविंद सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्व मालक व कामगार यांचे कौतुक करताना स्पष्ट केले की ही एकमेव संघटना आहे की आज सर्व कार्यरत 14 संघटना म्हणजे १४ रत्ने एकत्र करून सर्वांच्या हितासाठी लढणारी एकमेव संघटना असून यास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले आहेत ही शिवसेनेची संघटना असून सदैव आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील.

        शिव भारतीय पोर्टस सेना ही १४ रत्नांची संघटना असून भविष्यात ही संघटना महाराष्ट्रातील संपूर्ण किनारपट्टीवरील कामगारांचे यशस्वीपणे नेतृत्व करेल शिवसेना सदैव अन्याया विरोधात लढणारा पक्ष असून ही संघटना देखील पोर्टस विभागात जेथे अन्याय तेथे शिवसेनेचा भगवा ठामपणे तुमच्या सोबत उभा राहील तसेच भविष्यात देखील आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, पर्यावरण मंत्री युवा नेते आदित्य साहेब ठाकरे आपल्या सोबत असून मी आज पर्यंत तुमच्या न्याय हक्कासाठी पोर्ट ट्रस्ट शी लढा देत असून भविष्यात देखील शेवट पर्यंत लढा देईन तसेच दिल्ली दरबारी देखील तुमचे प्रश्न प्रचंड ताकदीने मांडेन व न्याय मिळे पर्यंत शांत बसणार नाही असे वचन दिले. तसेच शिव भारतीय पोर्टस सेनेचे अध्यक्ष श्री. कृष्णा पवळे व सर्व पदाधिकारी यांस शुभेच्छा दिल्या.

     या प्रसंगी विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग संघटक श्री. गणेश सानप व संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week