भाजपा नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी केली ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना मदत !!

भाजपा नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी केली ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांना मदत !!

       रुपेरी वरळी या वृत्तवाहिनीने केलेल्या पाठपुराव्याने मिळाली मदत!!  नानामामा, गोलमाल, जत्रा, यंदा कर्तव्य आहे, भिकारी, ही पोरगी कोणाची, वंटास यासारख्या मराठी चित्रपटात आणि नाटकात अव्वल भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांची परिस्थिती फार बिकट झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांच्याकडे कोणतेही काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच त्यांची गिरगाव येथील जुनी खोली ही ही विकसित होत आहे. त्यातच कौटुंबिक वाद असल्याने त्यांना बिल्डर कडून चेक मिळत नाही. त्यामुळे ते राहत असलेल्या भाड्याच्या घराचे भाडे कसे द्यायचे हा ज्वलंत प्रश्न आणि उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

       याबाबत त्यांची बातमी प्रसारमाध्यमामध्ये आल्यावर त्याची दखल विलेपार्ले येथील प्रभाग क्रमांक 70 च्या नगरसेविका सुनिता राजेश मेहता यांनी  माहिमकर यांना आपल्या कार्यालयात बोलवून आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली. मला नगरसेविका सुनीता  मेहता यांनी मदत केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मी गेल्या 1 वर्षांपासून बिल्डरकडे माझ्या भाड्याच्या चेकसाठी वणवण भटकतो आहे. माझे जगणे फार कठीण झाले असून मी जगावे की मरावे अशी माझी भावना झाली आहे. मला अजून न्याय मिळाला नसून याबाबत मी गिरगाव येथील विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले असून मला खात्री आहे की ते माझी समस्या सोडवून मला माझ्या घराच्या भाड्याच्या चेक मिळवून देतील अशी माहिती ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी दिली. माहिमकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी चित्रपट महामंडळ, मराठी कलाकार संघटना लवकरच मदत करतील अशी त्यांना अपेक्षा आहे. 

संपर्क:- ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहीमकर  :-  8356807208  / 9869680272


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week