
माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचा वाढदिवस साधेपणाने झाला साजरा !!
माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचा वाढदिवस साधेपणाने झाला साजरा !!
शिवसेनेचे आर्थर रोड येथील शाखा क्रमांक 199 चे माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांचा वाढदिवस विभागातील नागरिकांनी अगदी साधेपणाने साजरा केला. वाढदिवसानिमित्ताने कुसळे यांनी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही विभागातील अनेक कुटुंबियांना अन्नधान्य आणि जेवण वाटप केले. आमचा हा विभाग गिरणगाव असून या विभागात अनेक मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या प्रमाणात राहत असून अनेक ग्रामस्थ मंडळे देखील राहतात. त्याचे सर्व कुटुंब हे गावी राहत असून त्यांचे जेवणाचे खूप हाल झाले होते. ही समस्या ओळखून आम्ही त्यांना दोन्ही वेळेचे जेवण पुरवले. तसेच विभागातील नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एसटी बसेस देखील मोफत उपलब्ध करून दिल्या. मी दरवर्षी अगदी जोरदार माझा वाढदिवस जल्लोषात साजरा करतो.
पण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा केला नाही. तरी विभागातील अनेक नागरिक आणि सार्वजनिक मंडळांनी पुष्पगुच्छ आणि केक आणून माझा वाढदिवस अगदी साधेपणाने सामाजिक अंतर ठेवून साजरा केला असल्याची माहिती माजी शाखाप्रमुख राजेश कुसळे यांनी दिली.