सौ. नंदिनी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी केले उदघाटन !

सौ. नंदिनी भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांनी केले उदघाटन !

        कुलप्रेमी वझिरा नाका, बोरिवली (प) येथे सौ. नंदिनी भोईर (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मच्छीमार सेल) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री नामदार श्री. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आचार्य श्री. धर्मराज गुरूजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नंदिनी भोईर यांनी करून नामदार श्री .भरणे मामा यांचे स्वागत केले. त्यांच्या ह्या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांना नामदार श्री. भरणे मामा यांनी शुभेच्छा दिल्या तसेच यापुढील काळात आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण राज्याचे मत्स्यव्वसाय राज्यमंत्री या नात्याने कटीबद्ध असल्याची ग्वाही उपस्थित कोळी बांधवांना दिली. यावेळी कोळी बांधवांनी नामदार श्री. भरणे मामा यांचे पारंपारीक वाद्य वाजवून  स्वागत केले त्यांच्या स्वागत व प्रेमाने मी भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया देताना माझ्या आयुष्यातील कोळी बांधवांनी केलेला सन्मान कधीही विसरू शकणार नसल्याचे नामदार श्री. भरणे मामा यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार श्री. प्रसाद सुर्वे, श्री. बबनराव मदने उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई शहर, समाजसेवक बंटी महाडिक, तसेच कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week