
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा आपल्या क्षेत्रात प्रवेश करणार !!
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा आपल्या क्षेत्रात प्रवेश करणार !!
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा समाजसेवेच्या भावनेतून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे, माजी परिचारिका म्हणून त्या मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी संवाद साधणार आणि नव्या परिचारिकांना काही मोलाचे मार्गदर्शन संदेश देणार आहेत. दोन दिवस मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हा संवाद आयोजित करण्यात आला आहे पहिल्या दिवशी नायर रुग्णालय आणि दुसऱ्या दिवशी सायन रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स पाळून या गोष्टी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
शिवसेना महिला उपविभागप्रमुख, नगरसेविका, प्रभाग समिती अध्यक्ष ते मुंबई महापौर असा राजकीय प्रवास असनाऱ्या किशोरी पेडणेकर यांच्या ह्या उपक्रमाचे कौतुक सर्व घटकांकडून केले जात आहे.