सत्यम क्रीडा मंडळाने आयोजित केले मोफत आरोग्य शिबीर !

सत्यम क्रीडा मंडळाने आयोजित केले मोफत आरोग्य शिबीर !

        सत्यम क्रीडा मंडळाने दिनांक: 20/12/2020 रोजी श्री. साई मंदिर ट्रस्ट, बि.डी.डी.चाळ 11 व 12 ना. म. जोशी मार्ग, मुंबई यांच्यासोबत कै. सुधाकर शंकर गुडूळकर यांच्या स्मरणार्थ, कोरोनामुळे होणारे साईट इफेक्टचे प्रमाण कमी करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून "मोफत आरोग शिबीर, नेत्र शिबीर व मोफत चष्मा वापर वाटप शिबिराचे आयोजन केले.

       सदर शिबिराचे उद्घाटन ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ. संगीता पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रोशन रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले सदरच्या कार्यक्रमाला सन्माननीय श्री. सचिन अहिर (माजी गृह.राज्यमंत्री, शिवसेना नेते) व श्री. सुनील शिंदे (माजी आमदार) यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

      सदर कार्यक्रमाला सत्यम क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शासनाचे नियम, सामाजिक अंतर ठेवून शिस्तबद्ध रीतीने कार्यक्रम पार पाडला.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week